PM launches Swachh Bharat Mission-Urban 2.0 and AMRUT 2.0
Prime Minister Shri Narendra Modi launched Swachh Bharat Mission-Urban 2.0 and Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation 2.0, at Dr Ambedkar International Centre in New Delhi.
The Swachh Bharat Mission – Urban (SBM-U) was launched on 2nd October 2014 aims at making urban India free from open defecation and achieving 100% scientific management of municipal solid waste in 4,041 statutory towns in the country. Under SBM-U 1.0 more than 10 crore toilets were constructed to achieve the target of making urban India open defecation free.
Goal of ‘Swachh Bharat Mission-Urban 2.0’ is to make the cities completely free of garbage. Mission will focus on source segregation of solid waste by utilizing the principles of 3Rs that is “Reduce, reuse, recycle”. An outlay of Rs 1.41 lakh crore has been sanctioned for SBM-U 2.0.
Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM) was renamed to Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation (AMRUT) and then relaunched by Prime Minister Narendra Modi in June 2015
The purpose of “AMRUT” mission is to (i) ensure that every household has access to a tap with assured supply of water and a sewerage connection (ii) increase the amenity value of cities by developing greenery and well-maintained open spaces e.g., parks and (iii) reduce pollution by switching to public transport or constructing facilities for non-motorized transport e.g., walking and cycling.
AMRUT 2.0 mission will help in making cities self-reliant. It will ensure water security across the cities. This mission has been launched with the aim of providing 100 percent coverage of water supply to all households in 4,700 urban local bodies. This target will be achieved by providing 2.68 crore tap connections and 100% coverage of sewerage across 500 AMRUT cities. An outlay of Rs 2.87 lakh crore has been sanctioned for this mission.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ ची सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ ची सुरुवात डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र नवी दिल्ली येथून केली.
स्वच्छ भारत मिशन – शहरी (SBM -U) 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आले ज्याचे उद्दिष्ट शहरी भारत खुल्या शौचापासून मुक्त करणे आणि देशातील 4,041 शहरांमधील घनकचऱ्याचे 100% वैज्ञानिक व्यवस्थापन साध्य करणे आहे. SBM-U 1.0 अंतर्गत शहरी भारताला उघड्यावर शौच मुक्त करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी 10 कोटीहून अधिक शौचालये बांधण्यात आली.
आता ‘स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0’ चे ध्येय हे कचरामुक्त शहर, म्हणजे कचऱ्यापासून शहर पूर्णपणे मुक्त करणं असल्याचं या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले. “Reduce, reuse, recycle” या 3R च्या तत्त्वांचा वापर करून मिशन घनकचरा गोळा करतानाच त्याचे पृथक्करण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 साठी 1.41 लाख कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
जून 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मिशन (JNNURM) चे नाव बदलून अमृत (AMRUT) असे आले आणि या नव्या अमृत योजनेची पुन्हा सुरुवात केली.
“अमृत” मोहिमेचा हेतू हा शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनिःसारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरामध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे व इतर सुविधांची निर्मिती करणे.
अमृत २.० मिशन शहरांना स्वावलंबी बनविण्यात मदत करेल. हे संपूर्ण शहरांमध्ये पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करेल. 4,700 शहरी स्थानिक संस्थांमधील सर्व घरांना 100 टक्के पाणी पुरवठ्याच्या उद्दिष्टासह हे मिशन सुरू करण्यात आले आहे. हे लक्ष्य 2.68 कोटी नळ कनेक्शन आणि 500 अमृत शहरांमध्ये मलनिःसारणचे 100% कव्हरेज प्रदान करून साध्य केले जाईल. या अभियानासाठी 2.87 लाख कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.