Enquiry

  Contact Info

  Guidance Group

  2. स्वदेशी बनावटीचे विमान वाहक ‘विक्रांत’जहाजाचा पहिला सागरी प्रवास यशस्विरीत्या पूर्ण

  स्वदेशी बनावटीच्या विमान वाहक ‘विक्रांत’ जहाजाने (IAC) आज आपली पहिली सागरी यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. 4 ऑगस्ट 21 रोजी विक्रांत कोचीहून निघाले होते

  भारतीय नौदलाच्या, नौवहन रचना संचालनालयाने (डीएनडी) रचना केलेले स्वदेशी विमान वाहक जहाज ‘विक्रांत’ ची (आयएसी) बांधणी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)’ येथे केली जात आहे. 76% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह तयार केलेले आय एसी हे राष्ट्राच्या  “आत्मनिर्भर भारत” आणि भारतीय नौदलाच्या “मेक इन इंडिया” या संशोधन उपक्रमांचे एक प्रमुख उदाहरण आहे

  भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ प्रसंगी विक्रांतचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे.

  Post a Comment

   Enquiry Form