1. पीएम- दक्ष” पोर्टलआणि “पीएम-दक्ष” मोबाईल अॅपचे उद्घाटन
“पीएम- दक्ष” पोर्टलच्या माध्यमातून अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सफाई कामगारांना कौशल्य विकासाशी संबंधीत सर्व माहिती एकाच जागी उपलब्ध होईल
सामाजिकन्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एनइजीडीच्या सहकार्याने हे पोर्टल आणि अॅपविकसित केले आहे. या पोर्टल आणि अॅपमुळे लक्ष्यीत गटातील युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती सहजगत्या उपलब्ध होऊ शकेल.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, प्रधानमंत्री दक्षता आणि कुशलता संपन्नहिता ग्रही( पीएम-दक्ष) योजनेची अंमलबजावणी केंद्रसरकार वर्ष 2020-21 पासून करतआहे.
या अंतर्गत सुरु असलेल्या सर्व प्रशिक्षणांची माहितीदेखी मिळू शकेल. त्यांच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु असेल, त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी तो/ती सहज या पोर्टल अथवा अॅपवरून नोंदणी करू शकतील.
पीएम-दक्षपोर्टल http://pmdaksh.dosje.gov.in वर उपलब्ध आहे. तर पीएम-दक्ष मोबाईल अॅप गुगलप्लेस्टोर वरून डाऊनलोड करता येईल.
या पोर्टलची काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
यापोर्टलवर, मागासवर्ग, अनिसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मंत्रालयाच्या योजनांची माहिती एकाच जागी मिळू शकेल.
युवक-युवतींना त्यांच्या आवडीप्रमाणे, हव्या त्या प्रशिक्षण संस्थेत आणि प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याची सुविधा.
वैयक्तिक माहितीशी सबंधित आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा.
उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात, लक्ष्यीतगटांपैकी 2,73,152 लोकांना आता पर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्ष 2021-22 मध्येसुमारे 50,000 लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेन्द्रकुमार.
0 Comments
Share