Enquiry

  Contact Info

  Guidance Group

  E-Shram portal

  On August 26, 2021, the Ministry of Labour and Employment (MOLE) launched the E-Shram, the web portal for creating a National Database of Unorganized Workers (NDUW) including migrant workers, construction workers, gig and platform workers, etc., which will be seeded with Aadhaar.

  It is for the first time in the country that a system has been developed to register 38 crore Unorganised Workers.

  The e-Shram portal will cover all unorganised workers of the nation and help link them to social security schemes of the Government of India

  Under the scheme, Rs 2.0 Lakh Accidental Insurance cover will be provided to every registered (on eShram portal) unorganised worker

  If a worker is registered on the eShram portal and meets with an accident, he will be eligible for Rs 2.0 Lakh on death or permanent disability and Rs 1.0 lakh on partial disability

  Every registered unorganised worker shall be issued an eSHRAM card with a unique Universal Account Number (UAN) and will be able to access the benefits of the various social security schemes through this Card anywhere anytime

  Eligibility Criteria

  An unorganised worker between the age of 16 and 59 years

  The worker must not be a member of EPFO/ESIC or NPS

  ई-श्रम पोर्टल

  ई-श्रम पोर्टल केंद्र सरकारकडून २६ ऑगस्ट २०२१ रोजी लाँच करण्यात आले. हे पोर्टल म्हणजे स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसह असंघटित कामगारांचा पहिला डेटाबेस आहे.

  ई-श्रम पोर्टल देशातील ३८ कोटीहून अधिक असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करणार असून त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांसंबंधीच्या वितरणासाठी मदत करेल.

  ज्या कामगारांना पोर्टलवर नोंदणी करायची आहे त्यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक – १४४३४ प्रसिद्ध केला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण करणे हा आहे. पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती राज्य सरकारांच्या विभागांसोबतही शेअर केली जाईल. हे पोर्टल बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरगुती कामगार, कृषी कामगार, दुग्ध व्यवसायी, मच्छीमार, ट्रक चालकांसह सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करेल.

  कामगारांना काय फायदा होणार?

  जर एखाद्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली, तर त्याला २ लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ मिळेल. यामध्ये सरकारकडून एक वर्षाचा हप्ता दिला जाईल. जर नोंदणीकृत मजूर अपघाताचा बळी ठरला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल किंवा संपूर्ण अपंगत्व आले असल्यास त्याला दोन लाख रुपये मिळतील. तसेच अंशत: अपंगांसाठी विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जातील.

  प्रत्येक नोंदणीकृत असंघटित कामगाराला एक युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) असलेले eSHRAM कार्ड दिले जाईल आणि ते या कार्डद्वारे कधीही कुठेही विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ मिळवू शकतील.

  पात्रता निकष

  16 ते 59 वर्षे वयोगटातील एक असंघटित कामगार असावा.

  कामगार EPFO/ESIC किंवा NPS चा सदस्य नसावा

  Post a Comment

   Enquiry Form